top of page
  • Writer's picture

सिरीअल आणि ब्लूटूथ

Updated: Aug 10, 2021

या शिकवणीमध्ये आपण सिरीअल आणि ब्लूटूथ कसे वापरायचे ते पाहू

  • पहिल्या उदाहरणात, आपण एक चल १ ने वाढवत नेऊ आणि त्यास सिरीअल मॉनिटरवर प्रिंट करू

  • दुसर्‍या उदाहरणात, आपल्याला सिरीअल किंवा ब्लूटुथकडून एक अक्षर प्राप्त होईल आणि सिरीअल किंवा ब्लूटुथवर आलेल्या अक्षरानुसार एलईडी चालू व बंद केले जातील.वापरले जाणारे ब्लॉक्स

आपल्याला खालील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे "सिरीअल" विभागातमध्ये सिरीअल/ब्लूटूथ संबंधित ब्लॉक्स सापडतील

सिरीअल विभाग

जर ब्लूटुथ मॉड्यूल जोडलेले असेल आणि सिरीअलवर काहीतरी छापले गेले असेल तर ते सिरीअल आणि ब्लूटूथवर पाठविले जाईल. परंतु अक्षर ब्लूटूथद्वारे प्राप्त केले जाऊ शकते आणि सिरीअल मॉनिटरद्वारे नाही कारण

जर ब्लूटूथ मॉड्यूल जोडलेले असेल तर, ब्लूटूथला अक्षर प्राप्त करण्यासाठी सिरीअल मॉनिटरपेक्षा जास्त प्राधान्य असेल


१. सीरिअलवर पाठवा

या ब्लॉकमध्ये आपण मजकूर इनपुट करू शकतो जो सिरीअलवर प्रिंट होईल


२. सीरिअलवर अंक पाठवा

या ब्लॉकमध्ये आपण एक संख्या इनपुट करू शकतो कि जी सिरीअलवर प्रिंट होईल. ही संख्या पूर्णांक किंवा अपूर्णांक संख्या असू शकते.


३. सिरीअल/ब्लूटूथ वरील अक्षर प्राप्त करा

हे दोन्ही ब्लॉक्स समान आहेत. हा ब्लॉक चलामध्ये सिरीअल/ब्लूटूथ वर प्राप्त झालेले अक्षर मिळविण्यासाठी वापरला जातो


४. अक्षर

हा ब्लॉक एक अक्षर इनपुट करण्यासाठी वापरला जातो.


 


उदाहरण १

या उदाहरणात, आपण एक चल १ ने वाढवत नेऊ आणि त्यास सिरीअल मॉनिटरवर प्रिंट करू

serial print blocks
सिरीअलवर_लिहा
.txt
Download TXT • 3KBसिरीअल मॉनिटर उघडण्यासाठी, निर्मिती आयडीई मधील सिरीअल मॉनिटर चिन्हावर क्लिक करा. सिरीअल मॉनिटर बटण खालील फोटोमध्ये लाल बाण वापरुन दर्शविले आहे. कॉम पोर्ट आणि बाऊड रेट 9600 च्या समान निवडा आणि 'कनेक्ट' दाबा.


सिरीअल मॉनिटर बटण
सिरीअल मॉनिटरवर असे दिसेल


मोबाइलमध्ये ब्लूटूथद्वारे डेटा प्राप्त करण्यासाठी, खाली फोटोमध्ये दर्शविल्यानुसार ब्लूटूथ मॉड्यूल कनेक्ट करा

ब्लूटुथ मॉड्यूल निर्मिती बेस शील्डवर जोडलेले आहे

ब्लूटुथद्वारे निर्मिती बोर्डला मोबाइल वायरलेसरित्या कनेक्ट करण्यासाठी 'Serial Bluetooth Monitor' अ‍ॅप वापरा

अ‍ॅपवर असे दिसेल

 


उदाहरण २


या उदाहरणात, आपल्याला सिरीअल किंवा ब्लूटुथकडून एक अक्षर प्राप्त होईल आणि सिरीअल किंवा ब्लूटुथवर आलेल्या अक्षरानुसार एलईडी चालू व बंद केले जातील.

खालील ब्लॉक्समध्ये, अक्षर 'O' प्राप्त झाल्यास आपण हिरवा एलईडी चालू करतो आणि अक्षर 'F' प्राप्त झाल्यास आपण हिरवा एलईडी बंद करतो.


सिरीअल/ब्लूटूथवरील अक्षर प्राप्त करा
सिरीअलवरील_अक्षर_प्राप्त_करा
.txt
Download TXT • 3KB

सिरीअल मॉनिटरचा वापर करून निर्मिती बोर्डला अक्षर पाठविण्यासाठी, खालील फोटोमध्ये दर्शविल्यानुसार ट्रान्समीटर फील्डमध्ये लिहा आणि 'send' बटन दाबा.

सिरीअल मॉनिटर ट्रान्समीटर

सिरीअल ब्लूटूथ मॉनिटर अ‍ॅपचा वापर करून निर्मिती बोर्डकडे अक्षर पाठविण्यासाठी, खालील फोटोमध्ये दर्शविल्यानुसार ट्रान्समीटर फील्डमध्ये लिहा आणि 'send' बटण दाबा.

सिरीअल ब्लूटूथ मॉनिटर अ‍ॅपमधील ट्रान्समीटर

Comments


Post: Blog2_Post
bottom of page