top of page
  • Writer's picture

प्रवेग मापन

Updated: Aug 10, 2021


या शिकवणीमध्ये आपण निर्मिती बेस शील्डमधील प्रवेग मापकाचा (accelerometer) वापर कसा करायचा ते शिकणार आहोत. निर्मिती बेस शील्डमध्ये आयएमयू (इनर्शिअल मोशन युनिट) सेन्सर, MPU6050 आहे.


आयएमयू चे मापदंड

वापरले जाणारे ब्लॉक


आयएमयू वाचा

आयएमयू वाचा ब्लॉक

या ब्लॉकचा उपयोग X, Y आणि Z या तीनही अक्षांचा प्रवेग आणि कोनात्मक गती मिळविण्यासाठी केला जाऊ शकतो.



प्रवेग वापरून कोन कसे मापन करावे?

आपल्याला माहित आहे की पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ती आहे कि जी प्रत्येक वस्तू त्याच्या केंद्रबिंदूकडे आकर्षित करते. म्हणून जरी ती वस्तू हालचाल करत नाही तरीही पृथ्वीवरील प्रत्येक स्थिर वस्तूचा पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे प्रवेग आहे . या प्रवेगला गुरुत्वाकर्षणामुळे प्रवेग म्हणतात (g) जे 9.8 m/s^ 2 आहे.

गुरुत्वाकर्षणामुळे प्रवेग

कोन मोजण्यासाठी आपण गुरुत्वाकर्षणामुळे प्रवेगाचा वापरणार आहोत. प्रवेगमापक ३ अक्षांवरील प्रवेग मापन करतो. जर सेन्सर वरच्या बाजूस तोंड करून असेल तर g(गुरुत्वाकर्षणामुळे प्रवेग) Z अक्षाकडे असेल. जर सेन्सर एका बाजूस झुकले असेल तर हा g ,Zआणि इतर दोन अक्ष X आणि Y मध्ये विभागला जाईल. पुढील फोटोमध्ये आपण पाहू शकता g ,Zआणि Xअक्षात विभागला आहे.

गुरुत्वाकर्षणचा वेक्टर आणि त्याचे विभाजन
angle calulation from gravity

वरील आकडेमोड खालील उदाहरणात लागू केली आहे


Example

प्रवेगमापन
.txt
Download TXT • 4KB

टीपः वरील उदाहरणात, सुरुवातीला 'a' या चलामध्ये -1 हि संख्या टाकली आहे , जे सांगते की या चलामध्ये धन आणि ऋण पूर्णांक संख्या आपण टाकू शकतो. जर 'a' मध्ये अशी -1 संख्या टाकली नसती तर 'a' मध्ये आपण फक्त धन पूर्णांक संख्याच टाकू शकलो असतो.


Comments


Post: Blog2_Post
bottom of page