top of page

गोष्ट निर्मितीची

लहान मुलांपासून ते इंजीनियरिंग तसेच इलेक्ट्रोनिक्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी  इलेक्ट्रोनिक्स शिकणे हे किफायतशीर ,सोपे आणि भाषेवर अवलंबून नसणारे बनवण्यासाठी विवेकानंद ढाकणे याने  कोविड-१९ च्या लॉकडाऊनमधे,  सुरु केलेला हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा पहिला नमुना बनवण्यासाठीचे अनुदान हे SINE आयआयटी बॉम्बे, मुंबई या संस्थेने भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या "निधी प्रयास" या योजने अंतर्गत दिले आहे. निर्मितीमध्ये मायक्रोकंट्रोलर बोर्ड, बेस-शिल्ड बोर्ड आणि वापरण्यास सोपे असे आय-डी-ई म्हणजे सोफ्टवेअर आहे. या सोफ्टवेअरमधे आपण एम्बेडेड-सी(embedded C) वापरून किंवा ब्लॉक्स वापरून प्रोग्रामिंग करू शकतो. विशेष म्हणजे वापरकर्ते आपल्या मातृभाषेचा वापर करून निर्मिती बोर्डला प्रोग्राम करू शकतात.

About us: About

आमची टीम  

About us: Team Members
Vivekanand

प्रोडक्ट डेव्हलपर

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन या शाखेत बी.टेक पूर्ण केले. सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, मुंबई येथून एस.एस.डी (सॉलिड स्टेट डिव्हाइसेस) मध्ये एम.टेक करत आहे.

कामांची जबाबदारी: हार्डवेअर व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट 

Capture_edited.jpg

रोहित काळे

अॅप्लीकेशन डेव्हलपर 

सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, मुंबई येथे आयसीएस (इंटिग्रेटेड सर्किट्स अँड सिस्टीम्स) मध्ये एमटेक करत आहेत.

कामांची जबाबदारी: एम्बेडेड सी मध्ये निर्मिती बोर्डसाठी लायब्ररी बनवणे

SINE IITB Logo

या प्रकल्पाचा पहिला नमुना बनवण्यासाठीचे अनुदान हे SINE आयआयटी बॉम्बे या संस्थेने भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या "निधी प्रयास" या योजनेअंतर्गत दिले आहे. 

About us: About
bottom of page